vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे. याचा सातारा शहर वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

पौष्टीक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बध्दकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो. तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, ह्यदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये माण, खंडाळा येथील देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी ,कराडची नाचणी, जावळी, पाटण चा देशी इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगाव चा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पोष्टिक तृणधान्यांपासुन तयार केलेल प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पुर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. थेट शेतक-यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य खरेदीची संधी सातारकरांना मिळणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

कोकणवासियांना मोठा दिलासा- गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त तिकीट खिडक्या    खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर,प्रवासी संघटनेने मानले नरेश म्हस्के यांचे आभार  

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

रविवारी (दि.११) शहरातील काही भागात‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे