vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी  विभाग यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली, प्रतिनिधी-प्रगत, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित भाषा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयुष ज्ञानप्रणालींचे अनेक भारतीय भाषांमध्ये अधिक वेगाने लिप्यंतर आणि भाषांतर करता यावे, यासाठी आयुष मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत, असलेल्या ‘डिजिटल इंडिया भाषिणी (BHASHINI) विभाग, यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली

“भाषिणी राज्यम – भाषिणी सहयोगी कार्यक्रम” या उपक्रमांतर्गत, आयुष मंत्रालयाचे विविध डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सेवांमध्ये भारताची राष्ट्रीय भाषेची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असलेल्या ‘भाषिणी’, या प्लॅटफॉर्म चे एकत्रीकरण करणे, हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे.आयुष मंत्रालय, ‘आयुष ग्रिड’ उपक्रमाद्वारे, आरोग्यसेवा, क्षमता विकास, संशोधन, औषध प्रशासन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. या सेवांची अधिक व्यापक उपलब्धता आणि पोहोच सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, ‘आयुष ग्रिड’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली विविध पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि एआय-आधारित उपाय, भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 22 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

या सहयोगामुळे ‘आयुष ग्रिड’ पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि एआय साधनांसह विविध आयुष डिजिटल उपायांमध्ये ‘डिजिटल इंडिया भाषिणी’ च्या तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करेल. यामुळे बहुभाषिक उपलब्धता अधिक बळकट होईल आणि देशभरात डिजिटल पोहोच आणखी वाढेल.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

आयुषचे ज्ञान प्रत्येक भारतीय भाषेत उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, “आयुष औषध प्रणालीमध्ये अफाट सांस्कृतिक ज्ञान आणि सांस्कृतिक खोली समावली आहे. हे ज्ञान प्रत्येक भारतीय भाषेत उपलब्ध करून देणे, सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आणि जनसंपर्कासाठी अत्यंत आवश्यक आहे. भाषिणी बरोबरच्या या सहयोगाद्वारे, आयुष परिसंस्थेतील बहुभाषिक क्षमता बळकट करणे, क्षेत्रा-विशिष्ट भक्कम संज्ञावली विकसित करणे आणि भाषिक सीमा ओलांडून नागरिकांना अखंडपणे सहाय्य करणारी, भविष्यासाठी सज्ज कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली उभारणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”या उपक्रमामुळे भाषिणी भाषांतर एपीआय, स्पीच आणि व्हॉइस तंत्रज्ञानाचे आयुष डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रीकरण करणे सुलभ होईल, यामुळे देशातील विविध भाषिक क्षेत्रांमध्ये ते सहज उपलब्ध होईल आणि यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढेल.

 

संबंधित पोस्ट

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

मागील SIR यादीत तपशील शोधा

माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta