vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्राप्तिकर विभाग, नागपूरतर्फे प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात “प्रारंभ–2026” जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तंत्रज्ञानावर आधारित करदाता सेवा आणि सुलभ कर कायदे ऐच्छिक अनुपालन बळकट करतील”-डॉ.सिबिचेन के.मॅथ्यू,महासंचालक,एनएडीटी

प्राप्तिकर विभाग, नागपूरतर्फे प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात “प्रारंभ–2026” जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन,तंत्रज्ञानावर आधारित करदाता सेवा आणि सुलभ कर कायदे ऐच्छिक अनुपालन बळकट करतील”-डॉ.सिबिचेन के.मॅथ्यू,महासंचालक,एनएडीटी

राज्य प्रतिनिधी-प्राप्तिकर विभाग नागपूरतर्फे 14 मे 2026 रोजी नागपूरमधील सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 च्या तरतुदींविषयी जनजागृती आणि संपर्क कार्यक्रम “प्रारंभ–2026” चे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. करदात्यांना आणि संबंधित घटकांना नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 च्या प्रमुख वैशिष्ट्यांशी परिचित करणे आणि जनजागृतीद्वारे ऐच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी),नागपूरचे महासंचालक डॉ. सिबिचेन के. मॅथ्यू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूरचे प्रधान प्राप्तिकर आयुक्त सुनील उमाप यांनी कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण केले तसेच सहभागींचे स्वागत केले.

सिबिचेन के. मॅथ्यू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राप्तिकर कायदा, 2025 मागील दृष्टीकोन आणि उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. करदात्यांसाठी कर कायद्यांचे सुलभीकरण, कायदे समजण्यास सुलभता आणि गुंतागुंत कमी करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. तंत्रज्ञान-आधारित करदाता सेवांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. कर-संबंधित बाबींवर त्वरित मार्गदर्शन आणि मदतीसाठी विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित “कर साथी” चॅटबॉटचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सर्व संबंधितांना आवाहन केले.

या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, कायदेविषयक तज्ञ, सनदी लेखापाल , प्राप्तिकर सल्लागार, कर संकलक आणि करदाते, तसेच नागपूर येथील प्राप्तिकर विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

तांत्रिक सत्रांमध्ये प्राप्तिकर कायदा, 2025 अंतर्गत असलेल्या प्रमुख तरतुदी आणि मोठ्या बदलांचा आढावा घेण्यात आला.यामध्ये सामाजिक संस्था, टीडीएस तसेच गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण यांचा समावेश होता.या कार्यक्रमात एक दृकश्राव्य सादरीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित “कर साथी” चॅटबॉटचे थेट प्रात्यक्षिक, संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रे आणि माहितीपत्रकांचे वितरणही करण्यात आले. करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच हितधारकांशी संवाद साधण्यासाठी हा उपक्रम माहितीपूर्ण असल्याबद्दल सहभागींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 

संबंधित पोस्ट

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

पंचरत्न महापुरुष संयुक्त मंच वतीने छ शिवाजी महाराज संत रविदास संत कक्कया संयुक्त जयंती..

vishwatmaklokswamivarta

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -अखेर हिंदु संघटनांची मागणी मान्य; ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ संमत .आता खऱ्या अर्थाने ‘लाडक्या बहिणीं’चे संरक्षण होईल ..