vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान कार्यालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रस्तावाला गती; नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी दुहेरी सकारात्मक हालचालPMO ने रेल्वे बोर्डाकडे पाठविला प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे केला वर्ग — केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या पाठपुराव्याला यश

पंतप्रधान कार्यालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रस्तावाला गती; नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी दुहेरी सकारात्मक हालचालPMO ने रेल्वे बोर्डाकडे पाठविला प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे केला वर्ग — केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या पाठपुराव्याला यश

जिला प्रतिनिधी-गडचिरोली, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नागभीड–मार्कंडादेव नवीन रेल्वेमार्ग विस्ताराच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने (PMO) संबंधित प्रस्ताव आवश्यक कार्यवाहीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यानंतर आता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयानेही हा प्रस्ताव दि. २२ जुलै २०२६ रोजी क्रमांक कार्या-२/म.सहा.दंडा/कावि/३२९२/२०२६ नुसार विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती अधिकृत पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या मागणीला प्रशासनाच्या विविध स्तरांवर गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था, मार्कंडादेव (ता. चामोर्शी)चे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी दि. ९ जुलै २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून नागपूर (इतवारी)–नागभीड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचा विस्तार ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या मार्कंडादेव पर्यंत करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत प्रथम पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला, तर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव वर्ग करून पुढील प्रशासकीय प्रक्रियेला चालना दिली आहे.निवेदनात चामोर्शी तालुक्यात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक विकासाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. परिसरातील खनिज संपत्ती, वनउत्पादन प्रक्रिया उद्योग, कृषी व कृषीपूरक व्यवसाय तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे भविष्यात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीची मोठी गरज निर्माण होणार आहे. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगांना स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था मिळून नवीन उद्योगांना चालना मिळेल तसेच स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.याशिवाय नागपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज लक्षात घेता रेल्वेमार्गाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. रेल्वेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, किफायतशीर आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.

धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, लघुउद्योग आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना मोठा फायदा होईल.

भविष्यात या रेल्वेमार्गाचा विस्तार अहेरी, सिरोंचा तसेच तेलंगणा राज्यापर्यंत करण्याची क्षमता असल्याने दक्षिण गडचिरोलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळू शकते. या मार्गामुळे राज्यांमधील संपर्क अधिक मजबूत होऊन व्यापार आणि दळणवळणालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव वर्ग करणे, या दोन्ही सकारात्मक घडामोडींमुळे नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गाच्या मागणीला अधिकृत स्तरावर बळ मिळाले आहे. आता या मार्गाचे सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास, आर्थिक व्यवहार्यता आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक, उद्योग क्षेत्र आणि विविध सामाजिक संघटनांनी या घडामोडींचे स्वागत केले आहे. हा रेल्वेमार्ग भविष्यात गडचिरोलीच्या विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

 

==========

संबंधित पोस्ट

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा