vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली प्रतिनिधी-

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीनं वंदे मातरम्‌ बाबत घेतलेल्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली.

काँग्रेसनं १९३७ मध्ये वंदे मातरम्‌च्या केवळ दोन कडव्यांचं गायन करण्याचा निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी वंदे मातरम्‌चे दोन तुकडे करण्यात आले. यामुळेच देशाच्या फाळणीचा पाया रचला गेला असा दावा त्यांनी केला. हाच निर्णय आता पुन्हा पुढे नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे वंदे मातरम्‌ या गीताचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो देशवासीयांचा अपमान झाला आहे, असंही शहा म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारनं वंदे मातरम्‌बाबतचा काँग्रेसचा जुना निर्णय दुरुस्त करून राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी त्याला कायदेशीर आधार दिला आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस, संसदेनं केलेल्या कायद्याला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोध करतेय असा आरोप त्यांनी केला.

संबंधित पोस्ट

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा अधिक चांगला वापर करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने उचललेली पावले

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान