vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

 

ठाणे, प्रतिनिधी- लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची, जागेची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकांची निकोप वाढ व्हावी, यासाठी लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सन 1985 पासून जिल्हा पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. हे पुरस्कार कॅलेन्डर वर्षामध्ये पात्र लघु उत्पादन उद्योजकांना देण्यात येतात.

अधिकाधिक लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान कार्यपध्दती, व्यवस्थापन, कौशल्य उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य व संशोधन इत्यादी बाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतूने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करणे व उद्योजकतेस प्रोत्साहन देणे, ही या योजनेमागील भूमिका आहे.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा सल्लागार समितीद्वारे छाननी करुन प्राप्त अर्जामधून निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट लघु उद्योजकांना या योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास प्रथम पारितोषिक रु.15 हजार व द्वितीय पारितोषिक रु.10 हजार तसेच मानचिन्ह सत्कारपूर्वक प्रदान करण्यात येते.

जिल्हा पुरस्कारासाठी खालीलप्रमाणे पात्रता विहीत करण्यात आलेली आहे.

1. मागील 3 वर्षात सलग उत्पादन करीत असणारे घटक अर्ज करण्यास पात्र आहेत.2. घटक उद्यम पोर्टलवर कमीत कमी मागील 3 वर्षांच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या लघु उद्योग म्हणून नोंदणीकृत झालेले असावे.

3. नाविण्यपूर्ण उत्पादन असणाऱ्या व तंत्रज्ञानाची जोड असलेल्या उत्पादन घटकांना प्राधान्य.

4. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.5. ज्या घटकांना यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, असे घटक या पुरस्कारासाठी पात्र होणार नाहीत.

वरीलप्रमाणे पात्रता असणाऱ्या उत्पादन प्रवर्गातील लघु उद्योजकांनी सन 2024-25 चे पुरस्कार निवडीकरिता व योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी विहीत नमुन्यात अर्ज व कागदपत्रे जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डिंग. 1 ला मजला मुलुंड चेक नाका (एलबीएस मार्ग), वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे पश्चिम-400 604 येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत दि.10 एप्रिल 2025 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी § मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

vishwatmaklokswamivarta

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर