vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाबाबत,सुनावणी दि.25 मार्च ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 राखीव निकालाबाबत,सुनावणी दि.25 मार्च ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत

ठाणे, प्रतिनिधी- दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील 786 उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी सुनावणीकरिता संबंधित उमेदवारांना दि.25 मार्च 2025 ते दि.04 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 11 वाजता उमेदवारनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परीक्षार्थ्यांनी त्यांना कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. या दिवशी समक्ष हजर राहिला नाहीत तर आपणास या प्रकरणी काही सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय संबंधितांवर बंधनकारक राहील, याची नोंद घ्यावी.

सुनावणीच्या वेळी आपण आपले आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगीक सर्व कागदपत्रे, संदर्भात गुणपत्रक/प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र (चालक परवाना / बँक पासबुक / निवडणूक ओळखपत्र / पासपोर्ट यापैकी कोणतेही एक) यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

आयुष्मान भारत डिजिटल मिशन**रुग्णोपचार करण्याआधी सर्वसामान्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध**‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन संपन्न*डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल*

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta