vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आयुष्मान भारत डिजिटल मिशन**रुग्णोपचार करण्याआधी सर्वसामान्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध**‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन संपन्न*डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल*

*आयुष्मान भारत डिजिटल मिशन**रुग्णोपचार करण्याआधी सर्वसामान्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध**‘मॉडेल जिल्हा कार्यशाळेचे’ पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन संपन्न*डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचे मोठे पाऊल*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी आरोग्य व्यवस्थेचे डिजिटलायझेशन केल्याने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देता येणार आहेत. रायगड जिल्ह्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून सर्व सुविधा तळागाळापर्यंत पोहचावायच्या आहेत तेव्हाच रायगड हे ‘ मॉडेल जिल्हा’ बनेल. यासाठी आपण रोडमॅप बनवून त्यानुसार काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीइओ डॉ. सुनीलकुमार बर्नवाल यांनी केले.

  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशनची (ABDM) प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्याची ‘मॉडेल जिल्हा’ म्हणून निवड करण्यात आली असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी सुरुवातीसाठी आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात ‘रायगड मॉडेल जिल्हा उद्घाटन कार्यशाळेचे’ उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.   राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वपूर्ण या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक डॉ. पंकजकुमार अरोरा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रविन्द्रन, अतिरीक्त अभियान संचालक जगन्नाथ वीरकर, सहसंचालक डॉ. सुनीता गेहोलोत, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती नेहुलकर, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, पनवेल मनपा मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.   नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. बर्नवाल म्हणाले की सध्याचा जमाना हा जेन झीचा जमाना आहे. त्यामुळे डिजीटलायझेन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. ज्या खासगी आरोग्य संस्थां ABDM-संलग्न HMIS सुरू करून ABDM मध्ये व्यापक सहभाग सुनिश्चित करतील तेच ऑनलाईन सेवामध्ये दिसतील. अशा माध्यमातून सुविधांचे डिजीटलायलेझन केल्यास रूग्ण खबरदारी घेतील व लोक आजारी पडणार नाही, यामाध्यमातून आपण प्रतिबंधात्मक आरोग्याकडे वाटचाल करू शकणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

   आरोग्य विभागाचे सचिव ई.रविंद्रन यांनी या मिशन बाबत महाराष्ट्र राज्याने दिलेले योगदान आणि येत्या काळात करण्यात येणाऱ्या नियोजनाविषयी विवेचन केले.रायगड जिल्ह्यातील यशस्वीतेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात हे मॉडेल राबविण्याचे उद्दिष्ट त्यांनी बोलून दाखविले

     श्री.पंकजकुमार अरोरा यांनी “आयुष्मान भारत डिजिटल मिशन” ची तांत्रिक बाजू आणि एकूणच त्याबाबतची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली.     डॉ.जगन्नाथ वीरकर यांनी “आयुष्मान भारत डिजिटल मिशन” बाबत प्रशासकीय व्यवस्था आणि करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर सादरीकरण केले.      रायगड जिल्ह्यातील ३८३ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आधीच ‘ABDM-संलग्न HMIS’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, आता जिल्ह्यातील खासगी आरोग्य संस्थांनाही यात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती नेहुलकर यांनी उपस्थितांना रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य क्षेत्रात झालेल्या आणि होत असलेल्या कामांविषयीची माहिती दिली.

*डिजिटल आरोग्य मोहिमेत महाराष्ट्राची गरुडझेप*महाराष्ट्र राज्याने डिजिटल आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. राज्यात आतापर्यंत ७.१२ कोटी नागरिकांचे ‘आभा आयडी’ (ABHA ID) तयार झाले असून, ९६ हजार २१० आरोग्य व्यावसायिक आणि ३४ हजार ९६४ आरोग्य संस्थांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय, राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘मायक्रोसाईट प्रोजेक्ट’ राबवून खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व आरोग्य संस्थांचा सहभाग वाढवला जात आहे. सद्यस्थितीत १० हजार ६०७ संस्थांमध्ये हेल्थ रेकॉर्ड लिंकिंगचे काम वेगाने सुरू असून, तब्बल २.३८ कोटी आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात लिंक करण्यात आल्या आहेत.*६५० हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती*आज पनवेलमध्ये होणाऱ्या या जिल्हा कार्यशाळेला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यस्तरावरून सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, विविध विभागांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक (रुग्णालये) यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यासोबतच ठाणे परिमंडळातील आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) पदाधिकारी असे सुमारे ६५० प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते..या कार्यशाळेत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची उद्दिष्टे, डिजिटल आरोग्य नोंदींची अंमलबजावणी, आभा आयडी निर्मिती, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री आणि हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री यांसारख्या तांत्रिक व महत्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.   कार्यशाळेची सुरुवात वंदे मातरम् गीताने, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली. सूत्रसंचलन कल्पना साठे यांनी केले. इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार ‘रायगड मॉडेल’

रायगड जिल्ह्याची ‘मॉडेल जिल्हा’ म्हणून झालेली ही निवड महाराष्ट्राच्या डिजिटल आरोग्य क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या उपक्रमातून समोर येणाऱ्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुभव भविष्यात राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी दीपस्तंभाचे काम करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जनकल्याण यात्रा पोहोचली बुलढाण्यात-* विशेष सहाय्य योजनांची जनजागृती* जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभांरभ; योजनांचा जागर होणार

विशेष लेख….पनवेल महानगरपालिका राज्यात अव्वल : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी*

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर