vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिल्लोड, सोयगावमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

सिल्लोड, सोयगावमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

            मुंबई, प्रतिनिधी सोडलेला पण खेळा लावला: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने व वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. या योजना व्यापक जनहिताच्या असून त्या पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. योजनांच्या अंमलबजावणीतील स्थानिक अडचणी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून दूर करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.

या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया आणि जल जीवन मिशनच्या अतिरिक्त सह अभियान संचालक श्रीमती दीपाली देशपांडे-सावेडकर यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते

मंत्री पाटील म्हणाले, पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या अडचणींमुळे कामांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या सोडविल्या जाव्या. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांच्या ग्रीड योजनेचा आढावा,जलजीवन मिशनअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील १०७ गावांसाठी मंजूर ग्रीड पाणीपुरवठा योजनेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण हा या योजनेचा जलस्रोत आहे. या योजनेच्या कामाची भौतिक प्रगती ८८.८३ टक्के झाली आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधून कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

जलसंपदा विभागासोबत संयुक्त बैठक,सोयगाव तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, पाणीपुरवठ्याशी निगडित प्रश्न मार्गी लावून योजनांच्या कामांना गती दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठा प्रश्नाकडे लक्ष,सोयगाव तालुक्यातील फर्दापूर (अजिंठा लेणी) सुधारात्मक पाणीपुरवठा योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या योजनेतील जलवाहिन्या बदलणे, जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती व नूतनीकरण, तसेच पंपिंग यंत्रणांशी संबंधित कामे पूर्ण झाली आहेत. अजिंठा लेणी हे जागतिक वारसास्थळ असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यरत राहावे. प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

0000

 

 

संबंधित पोस्ट

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…     

धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली,राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी