vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दीपावली – २०२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

दीपावली – २०२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई प्रतिनिधी-

🔷बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली – २०२६ प्रीत्यर्थ ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) केली. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना दीपावलीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.

🔷दीपावली – २०२६ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतची बैठक आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) महापौर दालनात झाली. उपमहापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, सभागृहनेते श्री. गणेश खणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आजमी, एआयएमआयएम गटनेते श्री. विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते श्री. यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सहआयुक्त (वित्त) श्री. देविदास क्षिरसागर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी यांच्यासह महानगरपालिका कामगार / कर्मचारी संघटनांच्‍या समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

🔷महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील या परिस्थितीचा सारासार विचार करून महानगरपालिकेतील गटनेते, पदाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱयांना ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान एकत्रितपणे अदा करण्यात येणार आआहे.

0000

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प.

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली; पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!शिवतीर्थाच्या भिंतीलगत बसलेल्या ८० वर्षीय वृद्धेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आस्थेवाईक चौकशी; पोलिसांना कुटुंबीय शोधून घरी सोडण्याचे अथवा वृद्धाश्रमात दाखल करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

vishwatmaklokswamivarta

पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल

उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश