
जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईकेविविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर
मुंबई, प्रतिनिधी : जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी दिले. सप्ताहाच्या आयोजनात लोकसहभाग वाढविणे, लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि विविध माध्यमांतून उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आदिवासी विकासमंत्री डॉ. वुईके यांनी दिले.



