vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईतील डिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई! १.२८ कोटी रुपयांचे ६४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त; एक आरोपी अटकेत

मुंबईतील डिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई! १.२८ कोटी रुपयांचे ६४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त; एक आरोपी अटकेत

मुंबई प्रतिनिधी-गोरेगाव पूर्व, मुंबई :डिंडोशी पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष मोहिमेदरम्यान १ कोटी २८ लाख रुपये किमतीचे ६४० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

२६ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ४:४० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथील हनुमान नगर, फिल्म सिटी रोडवरील सॅटेलाइट टॉवरजवळ एक व्यक्ती निळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला.

या प्रकरणी डिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७१/२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला २७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.🔹 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोलुरे, पोलीस हवालदार प्रदीप मोरे तसेच पोलीस शिपाई प्रवीण चव्हाण आणि नवनाथ शिंदे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध अमली पदार्थांच्या व्यवहारांवर आळा घालण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

संबंधित पोस्ट

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश”

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई!  बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

आझाद मैदान येथून हरवले आहेत 

पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक