vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम!

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम!

प्रतिनिधी

“सेवा संकल्प अभियाना” अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अभ्यासिका व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षणाचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. सध्याच्या आधुनिक डिजिटल युगात इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया तसेच विविध ऑनलाइन सेवांचा वापर कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या सायबर फसवणुकीपासून नागरिक व विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, ऑनलाइन आर्थिक सुरक्षितता राहावी, ओटीपीची गोपनीयता टिकून राहावी आणि संशयास्पद लिंक्स किंवा बनावट संदेशांपासून बचाव करता यावा, यासाठी विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण मनपा आयुक्त श्रीम. मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपआयुक्त डॉ. दिपाली चौगले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या प्रशिक्षण सत्रादरम्यान उपस्थितांना सायबर सुरक्षिततेच्या विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित व मजबूत पासवर्ड तयार करण्याची पद्धत, बँक खात्याशी संबंधित अथवा गोपनीय माहिती कोणाशीही सामायिक न करणे आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आली.

या सत्रात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व सक्रियतेने भाग घेत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध शंका व प्रश्न उपस्थित केले. उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे मार्गदर्शकांनी शंकांनिरसन करून त्यांना समर्पक उत्तरे दिली. या वेळी सिस्टीम अनालिस्ट श्रीम. श्रद्धा बाविस्कर, कनिष्ठ अभियंता श्री. संतोष लोणे, अभ्यासिका व्यवस्थापक श्री. यशवंत सगळे आणि श्री. राजेश घनघाव यांची विशेष उपस्थिती लाभली.

आजच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करणे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी इंटरनेट व ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी दक्षता बाळगावी आणि सायबर सुरक्षिततेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी ग्रामीण उत्पादनांना डिजिटल बाजारपेठेची नवी संधी‘गावाकडचं.कॉम’ महिला बचत गट व शेतकर्‍यांसाठी ठरणार हक्काचे व्यासपीठ

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा वापर वाढवा – कवी डॉ. हबीब भंडारे

vishwatmaklokswamivarta

प्रकल्प ‘AI-सारथी’चा शुभारंभ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एसआरटीएमयूचा अभिनव उपक्रम

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta