vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लाख २ हजार २१८ शेतकऱ्यांना ८६१.५६ कोटींचा लाभ,तीन याद्यांमध्ये १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी पात्र; १ लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण..

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लाख २ हजार २१८ शेतकऱ्यांना ८६१.५६ कोटींचा लाभ,तीन याद्यांमध्ये १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी पात्र; १ लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण..

 

नांदेड, प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सुरू आहे. आतापर्यंत शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १ लाख २ हजार २१८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६१.५६ कोटी रुपये इतकी कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

शासनाच्या दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. योजनेत अल्प, अत्यल्प किंवा बहुभूधारक असा भेदभाव न करता पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. कुटुंबाऐवजी वैयक्तिक शेतकरी हा लाभाचा घटक मानण्यात आला आहे.कर्जमाफी, एकरकमी परतफेड आणि प्रोत्साहनपर ला

योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज तसेच या कालावधीत पुनर्गठित झालेले अल्पमुदतीचे पीककर्ज दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असून दि. ३१ मार्च २०२६ रोजीपर्यंत परतफेड झालेले नसल्यास, संबंधित पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज बाकी आहे, त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (OTS) लागू आहे. अशा शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांवरील थकीत रक्कम दि. ३१ मार्च २०२७ पूर्वी भरल्यास त्यांना राज्य शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे.तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षांत पीककर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड केलेल्या आणि सन २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन त्याचीही मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची संपूर्ण अंमलबजावणी संगणकीय प्रणालीद्वारे होत असून, कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना भविष्यात पुन्हा कर्ज घेण्यास पात्रता राहणार आहे.नांदेड जिल्ह्यात तीन याद्या जाहीर योजनेच्या पोर्टलवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण २ लाख २४ हजार ८४७ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह पहिली यादी दि. २५ जुलै २०२६, दुसरी यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ आणि तिसरी यादी दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली आहे.यापुढेही पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप यादीत नाव आलेले नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अथवा कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समितीकडे संपर्काचे आवाहन

यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा योजनेच्या लाभाबाबत शंका असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे किंवा तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील तक्रार निवारण समित्यांकडे आतापर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन अशा एकूण १ हजार ८४० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १ हजार ६६६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्षजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात योजनेसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यरत आहे. श्री. ए. डी. भागानगरे, सहायक निबंधक (प्रशासन) हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेशी संबंधित तक्रारी किंवा शंकांसाठी संपर्क क्रमांक ९२८४३५०७३१ वर संपर्क साधावा.बोरगाव तेलंग येथील शेतकऱ्याच्या कर्जाबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण,बोरगाव तेलंग, ता. जि. नांदेड येथील शेतकरी शंकर अबानराव क्षीरसागर यांनी कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव न आल्यामुळे आत्महत्या केल्याचे समाजमाध्यमांवरून निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित कर्जाची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

मयत शेतकरी श्री. शंकर अबानराव क्षीरसागर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा वजिराबाद, नांदेड येथून दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने ते थकीत झाले. दि. ३१ मार्च २०२६ अखेर त्यांच्या कर्जखात्यावर २ लाख ८ हजार १०४ रुपये थकबाकी होती.संबंधित कर्जदाराची माहिती बँकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या पोर्टलवर अपलोड केली असून, सदर कर्ज एकरकमी परतफेड योजनेसाठी (OTS) पात्र असल्याचे बँकेने कळविले आहे. OTS अंतर्गत पात्र शेतकऱ्याने २ लाख रुपयांवरील थकीत रक्कम भरल्यानंतर त्याला नियमानुसार २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

सदर शेतकऱ्याने कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव न आल्याबाबत तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशी अथवा तक्रार केल्याचे निदर्शनास आलेले नाही. तसेच संबंधित कर्जदाराने कर्जमुक्ती योजनेबाबत बँकेशी संपर्क साधला नसल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.शेतकऱ्यांनी कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये

कर्जमुक्ती योजनेबाबत काही शंका अथवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँक, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, तहसीलदार किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या निकषांनुसार योग्य तो लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे यादीत नाव अद्याप आलेले नसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे.

*********

संबंधित पोस्ट

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांतील प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार रावल जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

चला शाळेत जाऊ या’ अभियानातून शाळांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन कटिबद्ध शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय.

vishwatmaklokswamivarta