vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडेल शाळेतील सुविधांचे ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून कौतुक,वाडेबोल्हाई येथील आरोग्य सेवा व शैक्षणिक सुविधांचा घेतला सविस्तर आढावा

मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडेल शाळेतील सुविधांचे ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून कौतुक,वाडेबोल्हाई येथील आरोग्य सेवा व शैक्षणिक सुविधांचा घेतला सविस्तर आढावा

पुणे प्रतिनिधी-ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील विविध सोयी-सुविधा, उपलब्ध पायाभूत व्यवस्था, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच संबंधित यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आधुनिक व पोषक वातावरण निर्माण करणे, या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या अनुषंगाने सचिव डॉ. पुलकुंडवार यांची वाडेबोल्हाई येथील भेट महत्त्वपूर्ण ठरली.’आरोग्य मंदिर’ म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष कौतुक

वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करताना डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तेथील सुविधा, स्वच्छता, सुबक व्यवस्था आणि आरोग्य सेवांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक करताना त्यांनी “खऱ्या अर्थाने मंदिराची अनुभूती देणारे आरोग्य मंदिर” अशा शब्दांत गौरवोद्गार काढले. आरोग्य केंद्रातील वातावरण आणि उपलब्ध सुविधांमुळे नागरिकांना आरोग्यसेवेबरोबरच विश्वास व दिलासाही मिळतो, ही बाब त्यांच्या कौतुकातून अधोरेखित झाली

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देणे आवश्यक आहे. या दृष्टीने मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचे महत्त्व अधोरेखित झाले

मॉडेल जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक कामकाजाचा आढावा,यानंतर डॉ. पुलकुंडवार यांनी वाडेबोल्हाई येथील मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी आणि शाळांमध्ये अध्ययन- अध्यापनासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.शाळेतील उपलब्ध सोयी-सुविधा, शैक्षणिक कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी निर्माण करण्यात आलेल्या वातावरणाचा त्यांनी आढावा घेतला. मॉडेल शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली

शाळेतील स्कील लॅबची पाहणी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडेबोल्हाई येथे भेटीदरम्यान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या स्कील लॅबची (कौशल्य विकास प्रयोगशाळा) पाहणी केली. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, सर्जनशीलता, नावीन्यपूर्ण विचार आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने स्कील लॅब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कृतीतून कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन,ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांतील सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल जिल्हा परिषद शाळा हे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही ठिकाणी उपलब्ध सुविधांची पाहणी करून सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी समाधान व्यक्त केले.

वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल जिल्हा परिषद शाळेच्या भेटीदरम्यान दोन्ही ठिकाणच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन डॉ. पुलकुंडवार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खऱ्या अर्थाने मंदिराची अनुभूती देणारे आरोग्य मंदिर या शब्दात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक केले

0000

संबंधित पोस्ट

विशेष लेख –   प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.       

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ;डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

गणरायाच्या दर्शनासोबत योजनांचा जागर!लोकसंवाद-२०२६’मधून शेगावात कृषी, आरोग्य, महिला-बालविकास व महसूल योजनांची माहिती

vishwatmaklokswamivarta