vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत मुंबई महानगरपालिकेद्वारे पूर्णत्वास आलेल्या तीन उड्‌डाणपुलांचे लोकार्पण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस,उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार उपस्थितीत संपन्न होणार 

मुंबईत मुंबई महानगरपालिकेद्वारे पूर्णत्वास आलेल्या तीन उड्‌डाणपुलांचे लोकार्पण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस,उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार उपस्थितीत संपन्न होणार

 

मुंबई प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या तीन उड्‌डाणपुलांचे आज होणार उद्घाटन सोहळा

मुंबई उपनगरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लाल बहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा पूल नागरिकांकरिता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे

गेल्या अनेक वर्षापासून धारावीतील रहिवाशांसाठी अतिशय महत्त्वाचाच समजला जाणारा सायन धारावी वांद्रे याला जोडणारा शिव रेल्वे स्थानकावरील उड्‌डाणपूल याचेही यावेळी लोकार्पण उद्घाटन करण्यात येणार आहे अनेक महिन्या पासून संपूर्ण धारावीकर याउड्‌डाणपूल उद्घाटनाची वाट पाहत होते त्यांची आज प्रतीक्षा संपणार आहे यामुळे पूर्व आणि पश्चिम विशेषकर धारावीकरांना याचा लाभ होणार आहे आणि येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे धारावीकरांनी लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने शिव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या उडान पुलाजवळ जमणार असल्याची माहिती विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे याबाबत पुढील माहिती अशी की

प्रकल्पांची नावे :-१. विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेवरील पूल.२. शीय रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेवरील पूल.३. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी न्यायालय, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतचा उड्‌डाणपूल.

मुंबई महानगरपालिकेने काढलेले पत्रकारानुसार-बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पूर्णत्वास आलेल्या उपरोक्त संदर्भाकित तीन उड्‌डाणपुलांचे लोकार्पण गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोवर २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता दृकश्राव्य (व्हर्चुअल) पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे.

हा सोहळा माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी व माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार जी यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपरोक्त पुलांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक_तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’*जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे?* – मंदिर महासंघ

15 सप्टेंबर, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन