vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन   

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जालना प्रतिनिधी: समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी, संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. याकरीता गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी आजच https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दि. 30 जुन 2026 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. तर इयत्ता 11 वी आणि बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दि. 15 जुलै 2027 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे. जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत त्यांना “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सदर नियम शिथील केला आहे.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन” १४५६७ – ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार / जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्प लाईन  

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार