
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रात्रकालीन रक्त संकलन मोहीम
आरोग्य प्रतिनिधी- जागतिक आरोग्य संघटना (WHO ) आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्र (NCVBDC ) यांच्या नवीन ईएलएफ मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील बिगर हत्तीरोगग्रस्त ( Non endemic ) म्हणून नोंद असलेल्या जिल्ह्यांचे ब्लॉक स्तरावरील Remapping करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपलिका कार्यक्षेत्रात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत Lymphatic Filariasis Remapping Night Blood Survey (NBS) मोहीम दिनांक 28 व 29 ऑक्टोबर 2026 या दोन दिवसांमध्ये राबविण्यात येत आहे.
सदर मोहीम नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रथमत:च राबविण्यात येत असल्याने या मोहीमेची पूर्वतयारी म्हणून दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पॅथॅालॉजीस्ट डॉ. विश्वदिप पाटील, डॉ. पद्मजा पाटील व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य पर्यवेक्षक श्री.गोरखनाथ पाटील यांच्या उपस्थितीत नमुंमपा मधील सर्व आरोग्य सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक यांना प्रत्यक्ष रक्तनमुने घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तसेच मोहीमेमध्ये घ्यावयाची दक्षता व प्रभावी अंमलबजावणी याकरीता प्रत्यक्ष रक्तनमुने घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मोहिमेकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रात चार ब्लॉक बनविण्यात आले असून प्रत्येक एका ब्लॉककरिता तीन कार्यक्षेत्र निवडले आहेत. अशाप्रकारे 12 कार्यक्षेत्रे निवडली आहेत. यामध्ये एका कार्यक्षेत्राकरिता 3 पथके याप्रमाणे एका ब्लॉककरिता 9 आणि नमुंमपा क्षेत्राकरीता दोन दिवसांमध्ये 36 पथके कार्यरत असणार आहेत.
दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी नमुंमपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे व सहा.आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या नियोजनानुसार 1 व 3 ब्लॉक मधील रमाबाई आंबेडकर नगर व संभाजीनगर सीबीडी, शिवाजीनगर नेरुळ, पिंपरी व कर्मनगरी 14 गावे, समतानगर व रामनगर कोपरखैरणे, नोसीलनाका, सेक्टर-7 घणसोली या कार्यक्षेत्रात रात्री 10:00 पासून Lymphatic Filariasis Remapping Night Blood Survey (NBS) मोहीम राबविण्यात आली.
28 ऑक्टोबरच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – सीबीडी येथील रमाबाई आंबेडकर नगर व संभाजीनगर कार्यक्षेत्रातील मोहीमेचा आरंभ होत असताना आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ तसेच नगरसेविका श्रीम. सुरेखा नरबागे व श्रीम. स्वाती गुरखे यांच्यासह जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.
नमुंमपाचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, महानगरपालिकेचे व शासनाचे बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा सेविका, पोलिस कर्मचारी व नमुंमपा सुरक्षा रक्षक तसेच डासअळीनाशक फवारणी कर्मचारी यांच्या मोलाच्या कामगिरीमुळे मोहीमेचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला असून एकूण 1800 रक्तनमुने गोळा करण्यात यश मिळाले आहे.
29 ऑक्टोबर 2026 रोजी ब्लॉक क्रमांक 2 व 4 करिता मोहिम होणार आहे.अ.क्र – ब्लॉक क्रमांक – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – कार्यक्षेत्र1 – 2 – इंदिरानगर – इंदिरानगर2 — – तुर्भे – तुर्भे स्टोअर्स3 — – पावणे – श्रमिक नगर4 4 – कातकरीपाडा – कातकरीपाडा5 — – चिंचपाडा – यादवनगर6 —- इलठणपाडा ईश्वरनगर सदर मोहिमेची व्यापक जनजागृती होण्याकरीता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये आशा सेविकांमार्फत माहितीप्रद हस्तपत्रके वाटप व जागरूकता सभांचे आयोजन करण्यात आले.
हत्तीरोगाचे जिवाणू मानवी शरीरामध्ये रात्री विश्रांतीच्या वेळेत अधिक सक्रीय होतात, यामुळे हत्तीरोगाचे अचूक निदान होण्याकरिता हे सर्व्हेक्षण रात्रीच्या वेळी 10 नंतर करुन नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात येत आहेत.
हत्तीरोगाच्या अचूक निदानासाठी रात्री घरोघरी जाऊन रक्तनमुने संकलित केले जात असून संबंधित कार्यक्षेत्रातील नागरिकांनी रक्तनमुना संकलनासाठी नमुंमपा आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व हत्तीरोग नियंत्रणासाठी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.



