vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर!

‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर!

विशेष प्रतिनिधी🔹 महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी #मुंबई आणि #पुणे येथे ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि बाप्पा डॉट ऑर्गचे श्रीपाद आष्टेकर यांच्या सहभागातून २९ ऑक्टोबर २०२६ पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

🔹 उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, लोककला, म्हणी, अंताक्षरी तसेच हिप-हॉप आणि रॅप अशा पारंपरिक व आधुनिक कलांचे सादरीकरण या उपक्रमात पाहायला मिळणार आहे. मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफ.सी. रोड) येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔹 सहभागासाठी प्रवेश शुल्क नाही! इच्छुक जोड्यांनी ‘http://bappa.org’च्या +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवावा. जोडीतील किमान एका सदस्याचे वय १८ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. सादरीकरण कोणत्याही भारतीय भाषेत करता येईल; मात्र त्यात मराठीतील किमान एक ओळ असणे बंधनकारक आहे.

🔹 प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाणार आहे. सार्वजनिक मतदानाच्या आधारे विजेत्यांची निवड होईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची रोख पारितोषिके, तसेच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य स्वरूपातील ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले जाईल.

🔹 २९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळे मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे सायंकाळी ७ वाजता, तर पुण्यातील एफ.सी. रोड येथे सकाळी १० वाजता होणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत दर रविवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

🔹 या उपक्रमाचा महाअंतिम सोहळा २६ जानेवारी २०२७ रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘कलाधिपती करंडक’ प्रदान करण्यात येणार असून, पुण्यातही सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.मुंबई आणि पुणे येथील नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यांना उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंत्री ॲड.शेलार आणि अष्टेकर यांनी केले

#राज्यउत्सव

संबंधित पोस्ट

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल – मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! हिंदु जनजागृती समिती*आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे