vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तुपेवाडी तलावातील अवैध पाणीउपसा बंद; प्रशासनाची धडक कारवाई

तुपेवाडी तलावातील अवैध पाणीउपसा बंद; प्रशासनाची धडक कारवाई

जालना,द प्रतिनिधी: बदनापूर तालुक्यातील मौजे तुपेवाडी परिसरातील तलावातून मोटार व पाइपलाइनद्वारे सुरू असलेला अवैध पाणीउपसा प्रशासनाने तातडीने बंद केला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने बदनापुर तहसीलादार यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार तहसीलदार बदनापूर, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) मंडळ अधिकारी, तलाठी, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी सरपंच तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तलावातील अनधिकृत पाणीउपसा करण्यासाठी वापरण्यात येणारा वीजप्रवाह खंडित करून पाणीउपसा तातडीने बंद करण्यात आला.यापुढे या ठिकाणी अशा प्रकारे अवैध पाणीउपसा होणार नाही, याबाबत संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक पोलीस ठाणे आणि महावितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे तलावातील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यास मदत होणार असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलावातील उर्वरित पाणीसाठा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि तहसीलदार तुषार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.-

संबंधित पोस्ट

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती