vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

 सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

 अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा पुणे सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायालय, सांगलीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम व जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. एम. चंदगडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, पोलीस उपअधीक्षक डी. ए. देशमुख, जिल्हा कारागृह अधीक्षक विजय कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अरुण मदने, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ माधुरी मोरे आदि उपस्थित होते.

 यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी सांगितले की, बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वारंवार न्यायालयात ने-आण करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे वेळ व मनुष्यबळाची बचत होऊन न्यायालयीन प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होईल. सांगली जिल्हा कारागृहात 25 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल उभारण्यात आले असून, या सुविधेमुळे प्रत्येक बंद्याला त्याचा लाभ मिळणार आहे. बंद्यांना त्यांच्या प्रकरणांची सुनावणी वेळेत होण्यास तसेच न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित बाबी अधिक सुलभपणे हाताळण्यास या सुविधेचा फायदा होणार आहे.

 दरम्यान, बंद्यांच्या पुनर्वसनासाठी कारागृहात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बंद्यांना समुपदेशन देऊन समाजातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या माध्यमातून बंद्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

 यावेळी विधीज्ञ दीपा कुरणे व विधीज्ञ ॲड. मारूती बुरुगंले यांनी बंद्यांना प्ले बारगेनिंगचे महत्व सांगून कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संतोष खंदारे, विजय चव्हाण, विजय गोंधळे, सुभेदार सुर्यकांत पाटील, गिते गुरूजी, सागर पाटील तसेच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ 

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta