vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

‘महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

 सांगली, प्रतिनिधी : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या ‘महास्ट्राईड’ (MahaSTRIDE) उपक्रमांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हा धोरणात्मक आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणी केल्याने कामगिरी-आधारित प्रोत्साहनपर अनुदानासाठी (Performance-Based Incentive) पात्र ठरल्याने सांगली जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व यंत्रणांचे अभिनंदन करून अशीच भरीव कामगिरी सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

 या उपक्रमांतर्गत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला असून जिल्ह्याने 82 टक्के गुणांकन मिळवले आहे. या गुणांसह सांगलीने संपूर्ण राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दरम्यान या यशाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आणि सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

 वार्षिक धोरणात्मक कृती आराखड्याच्या (ASAP) अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्याने तब्बल 61 कोटी रुपयांचे खाजगी भांडवल (Private Capital) उभारण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्याच्या या प्रयत्नांमुळे राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ मिळाले असून, सांगलीला गुंतवणुकीचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. मंजूर करण्यात आलेल्या 16 कोटी रुपयांच्या अनुदानाच्या वापराबाबतची सविस्तर नियमावली ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन