vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता!- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ

सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता!- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ

 सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि आपल्या धिप्पाड शरीरासाठी व जलद वाढीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR), कर्नाल द्वारे माडग्याळ मेंढीला ‘स्वतंत्र देशी मेंढी जात (New Indigenous Breed) म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

 दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ICAR च्या १४ व्या ‘ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी’च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे अधिकृत पत्र ICAR-NBAGR चे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना पाठवले आहे.

 यासंदर्भात जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी आनंद व्यक्त करून दिलेली प्रतिक्रिया अशी – जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे, माडग्याळ तसेच, आटपाडी तालुका तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात वर्षानुवर्षे मेंढीपालन केले जाते. माडग्याळ जात म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या मान्यतेकरिता पशुसंवर्धन विभाग गेले तीन वर्षे प्रयत्नरत असून, तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

माडग्याळ मेंढीचे वैशिष्ट्य, माडग्याळ मेंढी ही तिच्या लांब व उंच शरीरयष्टी, वैशिष्ट्यपूर्ण बाकदार नाक (रोमन नोज), लांब कान आणि जलद वजन वाढण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी व लगतच्या भागात या मेंढीचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कमी पाण्यात व प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची अफाट क्षमता हे या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

राष्ट्रीय मान्यतेमुळे भविष्यात होणारे प्रमुख फायदे * अनुवंशिक संवर्धन व शुद्धता (Genetic Conservation)   स्वतंत्र ‘ॲक्सेशन नंबर’ मिळाल्यामुळे आता या प्रजातीचे संवर्धन वैज्ञानिक पद्धतीने केले जाईल. संकरित प्रजननामुळे मूळ जात नष्ट होण्याचा धोका टळेल.

 * शासकीय योजना व निधी उपलब्धता केंद्र व राज्य शासनाकडून माडग्याळ मेंढीच्या पैदास, संशोधन व पैदासकारांच्या विकासासाठी विशेष अर्थसंकल्प, योजना व अनुदान उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

* पशुपालकांच्या उत्पन्नात मोठी वाढ (Brand Value)    राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ बोकड व मेंढ्यांना अधिकृत ब्रँड व्हॅल्यू प्राप्त होईल. यामुळे देश-परदेशातील बाजारात या मेंढ्यांना अत्यंत चांगला दर मिळेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक मेंढीपालकांना होईल.

 * शुद्ध पैदास केंद्र व सिमेन बँक (Breeding Center & Semen Bank    पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व शेळी विकास महामंडळामार्फत माडग्याळ मेंढीचे शुद्ध पैदास केंद्र आणि कृत्रिम रेतनासाठी (AI) सिमेन बँक स्थापन करण्यास गती मिळेल. * ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ    सांगली व परिसरात माडग्याळ मेंढीपालन हा एक अत्यंत शाश्वत, सुरक्षित आणि अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय बनेल.

00000

संबंधित पोस्ट

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता नकोआमदार सुधाकर अडबाले यांचे मंत्र्यांना निवेदन

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विशेष लेख  -8 मार्च – जागतिक महिला दिन;समाज तभी होगा महान जब नारी का होगा सन्मान…!

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

vishwatmaklokswamivarta