vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी

पैठणला १००

पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी..

मुंबई, प्रतिनिधी : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पैठण व पाचोड येथील आरोग्य संस्थांबाबत चर्चा झाली.

पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून सादर करावा. या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे, आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील आणि तीन जिल्ह्यांच्या सीमेलगतचे महत्वाचे ठिकाण असलेल्या पाचोड येथेही वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करून ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथील ४०० खाटांच्या महिला रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ, उपकरणे आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

पैठण व पाचोड येथील प्रस्तावित आरोग्य संस्था आणि महिला रुग्णालयामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. कुंभमेळ्यासह वाढत्या धार्मिक पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य राहील, असे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, सहसंचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

 

संबंधित पोस्ट

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार – संतोष साळवी कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापरावर चर्चा

सेवा संकल्प अभियाना’ला मोठे यश: अवघ्या एका महिन्यात तब्बल १००७ सनदांचे वाटप; ₹८.५६ लाखांहून अधिक महसूल जमा

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती;रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा– मंत्री नितेश राणे

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

नवी दिल्लीत १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’ राज्याचा विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत