हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह देशभरात १५० हूनअधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ !
हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह देशभरात १५० हूनअधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ !
राज्य प्रतिनिधी – मुंबई – विजयादशमीचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय. हे पर्व अधर्मावर धर्माची, असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक मानले जाते. विजयादशमीच्या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुरावर विजय मिळवला, तर प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्म संपवला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले होते. तोच उद्देश ठेवून हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात १५० हून अधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ आयोजित करण्यात आले होते.
मुंबईत पवई येथे तर नवी मुंबई येथील नेरुळ, तुर्भे, ठाणे (प.) तसेच रायगड जिल्ह्यात पनवेल, अलिबाग आणि पाली आदी ठिकाणी हे शस्त्रपूजन करण्यात आले. यात प्रारंभी उद्देश आणि महत्त्व सांगितल्यानंतर शस्त्रपूजन विधी करण्यात आला. श्री दुर्गादेवीची आरती करण्यात आली. ‘श्री दुर्गादैव्ये नम:’ हा सामूहिक नामजप केल्यानंतर हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. ‘ या शस्त्रपूजनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांमधील शौर्य जागृत होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होता येऊ दे’, अशी श्री दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. सर्व ठिकाणी घेण्यात आलेल्या पूजनाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.डॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती