vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

नांदेड प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ शुक्रवार 1 मे 2026 रोजी वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान, नांदेड येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठीसाठी, डॉ. दिलीप झवेरी यांचा गुजराती साहित्यकृतीसाठी गौरव

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

vishwatmaklokswamivarta