vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

 

बुलढाणा, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना यांच्या वतीने बुधवार दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्रेता बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत व अखंडपणे उपलब्ध राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्र. घिरके यांनी दिली.

देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ हा बंद पुकारला असून, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. सह आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत आहे.

अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधितांना पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांशी सतत संपर्क ठेवून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक तालुका व गाव पातळीवर आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी ९८५०१५०६८७, ७७२००४५०८५, ९९२२८९९९५८ किंवा ८२६२८७८८९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच acfdabuldhana@gmail.com या ई-मेलवरही संपर्क साधता येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रशासनाला निर्देश> • सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचन • १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

अकोला जिल्‍ह्यातील अकोट,मुर्तिजापुर,तेल्‍हारा,हिवरखेड नगरपरिषद आणि बार्शिटाकळी नगरपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकी करिता मतदान

vishwatmaklokswamivarta