vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

 

गडचिरोली प्रतिनिधी: नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्‍या १८ महिन्‍यांपासूून रिक्‍त होते. याबाबत मा. उच्च शिक्षणमंत्री, सचिव यांच्याकडे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत पाठपुरावा केल्‍यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्‍त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित केला.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ कलम ८१ अन्वये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणेची स्थापना करण्यात आली आहे. सदर न्यायाधिकरणाची कार्यक्षेत्र ही विद्यापीठ व संलग्नीत खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाविषयक याचिका व अपील याचिका यांचा निपटारा करण्याची तरतुद विषद करण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेत्रातील नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी दि. ३०/१०/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या १८ महिन्यांपासून नियमित अधिकारी नियुक्त केलेले नव्‍हते.

याबाबत अामदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, सचिव श्री. रेड्डी यांच्याकडे सतत पत्र व्‍यवहार व प्रत्‍यक्ष भेटी घेऊन पाठपुरावा केला. त्‍यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पीठासीन अधिकारी पदावर न्‍यायमूर्ती श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर (मा. उच्च न्‍यायालय, मुंबई) यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्‍ती करण्यात येत असल्‍याचा शासन निर्णय निर्गमित केला.

पिठासीन अधिकारी नियुक्‍त केल्‍यामुळे खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहे.

 0000

संबंधित पोस्ट

मुंबईत दिवाळी पहाटेच्या वेळी ड्रोन व उडत्या आकाश कंदीलांवर बंदी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta