vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये ऑनलाईन अर्ज भरून सहभागाचे आवाहन

नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये ऑनलाईन अर्ज भरून सहभागाचे आवाहन

 

              नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहाने साज-या होणा-या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी मुंबई महापौर गणेशदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी पारंपारिक स्पर्धेला अधिक व्यापक स्वरूप प्रदान करण्यात येत असून महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीने यामध्ये घरगुती गणेशोत्सवाचाही समावेश केला आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महापौर सार्वजिनक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2026 चे दिमाखदार आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सभापती श्री.गिरीश कान्हा म्हात्रे यांनी दिली आहे.

            गणेशोत्सवासारखा लोकोत्सव निसर्गाचा सन्मान राखून पर्यावरणशील व प्लास्टिकमुक्त साजरा केला जावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत यापूर्वीच करण्यात आलेले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना, मूर्तीची उंची 6 फूटापर्यंत मर्यादित असावी, तिचे विसर्जन 170 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावातच करावे, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, उत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमात आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण जागरूकता, संस्कृती संवर्धक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावेत असे सूचित करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने – उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार, उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार (5 दिवस), उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार ( 10 दिवस), घरगुती गणेशोत्सव पुरस्कार (10 दिवस), पर्यावरणपूरक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार असे प्रत्येकी 3 पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र अशा स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गणेशमूर्ती पुरस्कार, उत्कृष्ट देखावा (संकल्पना – Theme ) पुरस्कार, उत्कृष्ट सजावट पुरस्कार, उत्कृष्ट पारंपारिक गणेशोत्सव पुरस्कार, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक संदेश पुरस्कार अशा स्वरूपाचे स्वतंत्र उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एकूण 4 लक्ष 27 हजार रक्कमेचे पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.

            या स्पर्धेत सहभागाकरिता www.nmmcganesha.in या स्पर्धेच्या संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव स्पर्धा (5 दिवस) करिता अर्ज भरण्याचा अंतिम दि. 16 सप्टेंबर 2026 हा असून इतर सर्व पुरस्कार श्रेणीकरिता दि.20 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज भरणे गरजेचे आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.

            तरी ‘नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026’ मध्ये नवी मुंबईतील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणशील गणेशोत्सव साजरा करून सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती श्री.गिरीश कान्हा म्हात्रे व उपसभापती श्री. राजू भालचंद्र मढवी आणि सर्व समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.0000

संबंधित पोस्ट

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हाधिकारी म्हणुन आशिमा मित्तल यांनी स्विकारला पदभार…