vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

द्राक्ष पीकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने द्या; अन्यथा आमरण उपोषण!युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन२ नोव्हेंबरपर्यंत मुदतीचा इशारा

द्राक्ष पीकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने द्या; अन्यथा आमरण उपोषण!युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश मोहिते यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन२ नोव्हेंबरपर्यंत मुदतीचा इशारा

जालना (प्रतिनिधी) : आंबिया बहार २०२५-२६ अंतर्गत द्राक्ष पीकविमा योजनेची ट्रिगरनुसार मिळणारी उर्वरित रक्कम तातडीने वितरित करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सावंगी तलाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी दिला आहे. युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश मोहिते यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. येत्या २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लेखी माहिती देऊन उर्वरित रक्कम मिळवून देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विमा कंपनीने ट्रिगरच्या निकषांनुसार द्राक्ष पीकविम्याची संपूर्ण रक्कम अद्याप दिलेली नाही. याबाबत विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची उर्वरित विमा रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी गणेश मोहिते व शेतकऱ्यांनी केली.

निवेदनासोबत ट्रिगरबाबतचा शासन निर्णय, पर्जन्यमानाची माहिती आणि विमाधारक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची प्रत जोडण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींनाही देण्यात आल्या आहेत. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनावर शरद गाडेकर, ज्ञानदेव गाडेकर, सुरेखा गाडेकर, भाऊसाहेब गाडेकर, सोपान गाडेकर, हरिभाऊ गाडेकर, सखाराम कळकुंबे, आप्पासाहेब गाडेकर, संदीप गाडेकर, अमोल गाडेकर, रंगनाथ गाडेकर, विष्णू डोंगरे, अशोकराव डोंगरे, एकनाथ डोंगरे, अर्जुन सवडे, कृष्णा डोंगरे, रामेश्वर डोंगरे, गणेश काळे, धोंडीराम गाडेकर, सदानंद डोंगरे, कैलास काळे आणि गणेश मोहिते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रशासन या मागणीवर कोणती कार्यवाही करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 0000

संबंधित पोस्ट

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन