vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना जागतिक ओळख

शबरी नॅचरल्सच्या पॅकेजिंगमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव-‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा उल्लेख; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या आदिवासी उत्पादनांना जागतिक ओळख…

मुंबई, प्रतिनिधी: शबरी नॅचरल्सचे पॅकेजिंग हे केवळ उत्पादनांचे वेष्टन नसून त्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. या पॅकेजिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ जाहीर झाल्याने आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून शबरी नॅचरल्सच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रधानमंत्री यांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात शबरी नॅचरल्सचा विशेष उल्लेख केला.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमातून ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना चालना मिळत असून, आदिवासी उद्योजकतेला नवी दिशा मिळत आहे.

शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचे पॅकेजिंग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या कला परंपरा तसेच आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब या पॅकेजिंगमधून उमटते. त्यामुळे उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीची ओळख ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला ‘इंडिया डिझाईन मार्क’ तसेच जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. या सन्मानांमुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

आदिवासी बांधवांनी तयार केलेली नैसर्गिक उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी शबरी नॅचरल्सने डिजिटल माध्यमांचा अवलंब केला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना ही उत्पादने सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे दुर्गम भागांतील आदिवासी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे

यासोबतच कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातूनही शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बांबू हस्तकला, नैसर्गिक व कृषी उत्पादने तसेच मोहापासून तयार केलेल्या वस्तूंच्या आकर्षक भेटसंचांना विविध संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून मागणी मिळत आहे. या माध्यमातून आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडून आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

प्रधानमंत्री यांच्याकडून झालेला गौरव आदिवासी विकासाला बळ देणार– मंत्री डॉ. अशोक उईकेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा गौरवपूर्ण उल्लेख केल्यामुळे आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळाले आहे. शबरी नॅचरल्स हा केवळ उत्पादनांचा ब्रँड नसून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, कला आणि कौशल्य जगासमोर मांडणारा उपक्रम आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातून आदिवासी उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.

आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न– आयुक्त लीना बनसो,आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कलाकृती या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या शबरी नॅचरल्स ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री यांनी या उपक्रमाची दखल घेतल्याने अभिमानाची बाब असून, आदिवासी संस्कृती आणि उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केले.

 

०००००

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील एस.टी. आगारांमध्ये-प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिनाचे आयोजन

जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान १२ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध प्रभावी कारवाई, चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मूळ देशात परत पाठविणे, तसेच परदेशी नागरिक पोर्टलवर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची उत्कृष्ट कामगिरी

vishwatmaklokswamivarta

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. 

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta