vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

लातूर, प्रतिनिधी : येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विमानतळाला संयुक्त भेट देवून पाहणी करावी. त्यानुसार कालबद्ध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विमानतळविषयक बैठकीत ते बोलत होते.

आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर विमानतळाचे व्यवस्थापक राजेश जीवन यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होतेतसे. तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजकुमार बॅरी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

विमानतळाच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. येथील पांदन रस्त्याऐवजी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक बाबी लक्षात घेवून आवश्यक कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून याबाबत माहिती द्यावी. शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. बॅरी यांनी विमानतळावर प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. तसेच लवकरच लातूर विमानतळाची संयुक्त पाहणी करण्यात येईल, असे सांगितले.

 

*****

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ-पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन देशातील पुरोगामी समाजव्यवस्था आणि महिलांचा सर्वक्षेत्रातील वावर हा महात्मा जोतीबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि परिश्रमांचे फळ – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*