vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का? एक्स अकाउंट वर काय म्हणतात आदित्य ठाकरे युवा नेते आमदार

मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का? एक्स अकाउंट वर काय म्हणतात आदित्य ठाकरे युवा नेते आमदार

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का? एक्स अकाउंट वर काय म्हणतात आदित्य ठाकरे युवा नेते आमदार,आज मीरा रोड येथील मेट्रो लाईन ९ च्या कामादरम्यान थुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रोचा स्लॅब आणि बांधकामाचे साहित्य खाली कोसळले. अत्यंत धक्कादायक म्हणजे, खालून जाणारी स्कुल व्हॅन थोडक्यात बचावली!

 जर आज काही अघटित घडलं असतं, तर ह्याला जबाबदार कोण असतं?

काही महिन्यांपूर्वी मुलुंडमध्ये मेट्रो ४ चा स्लॅब कोसळून निष्पाप नागरिकाचा जीव गेला होता, तरीही ह्या भाजप-मिंधे सरकारला जाग आलेली नाही.

केवळ टक्केवारी आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी घाईघाईने निकृष्ट दर्जाची कामे रेटली जात आहेत. सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. पुन्हा असे प्रकार होऊ नये ह्यासाठी, जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने ‘ब्लॅकलिस्ट’ करा.

ह्या निष्काळजीपणासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील सर्व सुरू असलेल्या मेट्रो कामांचे ‘थर्ड पार्टी’ सुरक्षा ऑडिट तात्काळ करा.

संबंधित पोस्ट

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ…

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

vishwatmaklokswamivarta

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समिती स्थापन होणार शिवजयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी…

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta