vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काय म्हणाले ते पहा एक्स वरील संभाषण…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काय म्हणाले ते पहा एक्स वरील संभाषण…

मुंबई प्रतिनिधी -मुंबईत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या सहभागातून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अभूतपूर्व असा विशाल ‘गर्जना’ मोर्चा निघाला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकशाही आणि संविधानप्रेमी नागरिकांना संबोधित केलं.

•⁠ ⁠२०१७-२०१८ पासून राज ठाकरे तुम्हाला सांगत आलाय, यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेत्यांना भेटून सांगितलं होतं निवडणुकांवर बहिष्कार टाका त्याशिवाय दूध का दूध, पानी का पानी होणार नाही!•⁠ ⁠मी तेव्हा काय सांगत होतो ते सगळ्यांना आत्ता समजायला लागलं.•⁠ ⁠२०२४ विधानसभा निवडणुकीत संपुर्ण बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता हा कोणता विजय?•⁠ ⁠२०२४ लोकसभेनंतर २०२४ विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असे कसे मतदार वाढले?•⁠ ⁠लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला २ कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली. त्यानंतर ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३ कोटी १६ लाख १६ हजार मतं मिळाली.

•⁠ ⁠मला सत्ताधारी पक्षाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून आम्हाला राग नाही. तुम्ही सत्ता कशी राबवताय याबाबत आम्हाला राग आहे.•⁠ ⁠कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला विरोधात बसवायचं हे या देशातील लोकांनी ठरवायचं, निवडणूक आयोगाने नाही.•⁠ ⁠कोणताही राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत बसतो तेव्हा त्याला सत्ता जाण्याची भिती असते. अशी कोणतीही भिती राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये दिसत नाही.•⁠ ⁠आपण चुकीचा घेतलेला निर्णय, चुकीचं राबवलेलं धोरण हे भविष्यात चुकीचा पायंडा पाडणार का?, याचा विचार देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे.•⁠ ⁠आज सर्व विरोधी पक्ष व्यासपीठावर आहेत. सत्तेतले जे पक्ष आज व्यासपीठावर नाहीत त्यांनीही विचार करायला हवा, जेव्हा उद्या तुम्ही सत्तेतून जाल आणि तुम्ही आज जे करताय ते दामदुपटीने तुम्हाला भोगावं लागेल तेव्हा काय कराल?•⁠ ⁠महाराष्ट्रात आजपर्यंत जी SIR प्रक्रिया झाली ती संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे.•⁠ ⁠आत्तापर्यंत SIR मधून २ कोटी लोकं बाहेर काढलेत हे २ कोटी लोकं कोण आहेत? जेव्हा दिल्लीत याबाबत चर्चा होईल त्यावेळी SIR रद्द झाला पाहिजे ही मागणी करावी अशी माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे. •⁠ ⁠यापुढील सर्व निवडणुकांमध्ये EVM मशीच्या ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान झालं पाहिजे ही आजच्या या मोर्चामधून मी मागणी करत असल्याचे म्हटले आहे

संबंधित पोस्ट

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला30 संवर्गाचे स्कोअर कार्ड 11 सप्टेंबरला होणार महापालिका संकेतस्थळावर जाहीर,सद्यस्थितीत करार पध्दतीने कार्यरत कर्मचा-यांची पदे वगळून उर्वरित पदांवर देता येणार नेमणुका

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार