vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित…

कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित…

आरोग्य प्रतिनिधी-कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT स्कॅन ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तसेच निवडक १३ प्रकारच्या कर्करोगांसाठी पीईटी-सीटीचा स्वतंत्र अथवा नियमित प्राथमिक निदान प्रक्रिया म्हणून समावेश केला आहे. या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना स्वतःच्या खिशातून महागड्या तपासणीसाठी खर्च करण्याचा भार कमी होणार आहॆ.

सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शासन निर्णयानुसार, ६३ कर्करोग उपचारांचा पॅकेजमध्ये PET-CT तपासणीचा ‘अतिरिक्त निदान प्रक्रिया’ म्हणून समावेश केला आहॆ. तसेच १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी ‘स्वतंत्र निदान प्रक्रिया’ म्हणून या तपासणीला मान्यता देण्यात आली आहे.शासन निर्णय – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20202610151322349317.pdf

00000000

 

संबंधित पोस्ट

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय -डॉ. नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत…

सेवा संकल्प अभियानातून खेर्डा येथे आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांना चालना;गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta