vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत गेटवे ऑफ इंडिया येथे ऐतिहासिक भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत-गेटवे ऑफ इंडिया येथे ऐतिहासिक भेट

मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीच्या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना करून देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासमवेत आलेले शिष्टमंडळ उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केला

vishwatmaklokswamivarta