vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’..

 नवी दिल्ली प्रतिनिधी –

केंद्रीय गृह व सहकार मंत्री तसेच गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमित शाह यांनी आज अहमदाबाद महानगरपालिका, या मोहिमेत सहभागी झालेले २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक आणि गांधीनगर मतदारसंघातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ‘मियावाकी’ पद्धतीचा वापर करून अवघ्या एका तासात तब्बल 3 लाख 61 हजारांपेक्षा जास्त रोपट्यांची लागवड करत एक नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ रचल्याबद्दल त्यांनी हे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज पर्यावरण संवर्धनाला एका लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे अमित शाह यांनी यावेळी नमूद केले. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना निसर्ग रक्षणाच्या या उपक्रमाशी जोडले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत गांधीनगर लोकसभा मतदारसंघाने या चळवळीत एक नवी ऊर्जा निर्माण केल्याचे ते म्हणाले.

मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या एका तासात 3 लाख 61 हजारांहून अधिक रोपट्यांची लागवड करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करणे, हे लोकसहभाग, सूक्ष्म नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाप्रती असलेल्या सामाजिक कटिबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. या उल्लेखनीय कामगिरीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी अहमदाबाद महानगरपालिका, या मोहिमेशी जोडलेले सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, 25 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक आणि मतदारसंघातील जनतेचे विशेष कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

vishwatmaklokswamivarta

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन  • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास        आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स