vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राखीच्या धाग्यातून स्वच्छतेचं आणि पर्यावरणाचं नातं!

राखीच्या धाग्यातून स्वच्छतेचं आणि पर्यावरणाचं नातं!

नवी मुंबई प्रतिनिधी-रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये विद्यार्थिनींनी आपल्या स्वच्छता दूतांना टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करताना विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली.

नेरूळ येथील एपीजे शाळेत विद्यार्थ्यांनी E-Waste आणि Plastic Waste चे दुष्परिणाम समजून घेत, घरातील नादुरुस्त E-Waste व Plastic Waste मोठ्या प्रमाणात जमा केले. हा कचरा पर्यावरणात न मिसळता पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर आणि महापालिकेच्या 3R Centers विषयी माहिती देण्यात आली

📍 उपक्रमाची ठिकाणे:

नेरूळ गाव शाळा क्र. १० | जुईनगर शाळा क्र. १७ | शिरवणे शाळा क्र. १०१ व १५ | कुकशेत शाळा क्र. ९२ व १२१ | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. १२, सारसोळे | शिवाजी नगर, नेरूळ | एपीजे शाळा, नेरूळ | तसेच दिघा, सानपाडा, तुर्भे, घणसोली, ऐरोली, वाशी आणि कोपरखैरणे परिसरातील शाळा

मा. आयुक्त श्री. शिंदे साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. पवार साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच मा. उप आयुक्त डॉ. अजय गडदे, मा. उप आयुक्त (परिमंडळ-१) डॉ. अमोल पालवे, मा. सह आयुक्त तथा विभाग अधिकारी नेरूळ डॉ. अनुराधा बाबर आणि मा. मुख्य स्वच्छता अधिकारी (परिमंडळ-१) श्री. नरेश अंधेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर प्रसंगी मा. स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील, शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, स्वच्छता पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.राखीचा धागा जपूया; स्वच्छता आणि पर्यावरणाशी आपलं नातं अधिक घट्ट करूया!

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यासाठी 132 किलोलिटर केरोसीन मंजूर,तात्पुरत्या स्वरूपात वितरण सुरू- सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके-पलूस व तासगाव तालुक्यात वाटप गतिमान, इतर तालुक्यांतही लवकरच पुरवठा…

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान येथे मंगळवारी (दि.१६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत