vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान येथे मंगळवारी (दि.१६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान येथे मंगळवारी (दि.१६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१६ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे हा मेळावा होणार आहेया मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., बजाज ॲटो लिमिटेड, संजिव ऑटो पार्ट्स मॅन्यूफॅक्चरींग प्रा.लि., मेटलमन ऑटो लि., यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा.लि., औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.लि. वाळूज, स्टरलाईट टेक्नोलॉजी लिमिटेड, ग्रीव्हज कॉटन लिमिटेड,, व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड, एल ए पि एल अॅटोमोटिव लिमिटेड, ग्रोमेट सर्व्हिसेस प्रा.लि., बीजी-लीइन इलेक्ट्रीकल्स लि., गरवारे हायटेक प्रा.लि., रेहेल्को कंपनी, रत्नप्रभा मोटर्स, व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड, एस एस कंट्रोल, वाळूज, साई मॅनपावर सर्व्हिसेस प्रा.लि., अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अभिनव इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, नेक्स्लीड कंन्सल्टींग प्रा.लि., एक्सेल प्लेसमेट, हेडहंटर्स, जय इंटरप्रायझेस, एस डब्ल्यू मल्टीमिडिया, यशस्वी अकॅडमी फॉर स्कील्स, नरसिम्हा इंडस्ट्रीअल ट्रेनींग ॲड प्लेसमेंट लि. अशा विविध २७ आस्थापना कडून ३४१५ रिक्तपदे प्राप्त झाली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या २७ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0240-2954859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. गरजू युवक युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहून मुलाखती देऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त राजू वाकडे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

मुंबईतील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार- उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरण-आता डायरेक्ट इन्काऊंटर करा -प्रवीण तरडे अभिनेता

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न