vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ,शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांची व संत महंतांची उपस्थिती,गोदावरी पूजन, मंत्रोच्चार आणि शंखनादाने कुशावर्त तीर्थक्षेत्रात भक्तिचा निनाद

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ,शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांची व संत महंतांची उपस्थिती,गोदावरी पूजन, मंत्रोच्चार आणि शंखनादाने कुशावर्त तीर्थक्षेत्रात भक्तिचा निनाद

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात, मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित साधू-महंतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. सर्व प्राणिमात्रांना सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली

गणेशपूजनाने पूजाविधीचा प्रारंभ झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व धार्मिक विधी आणि आयोजन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीगणेशाला आवाहन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून देवतांचे आवाहन केले. त्यानंतर ध्वजारोहणासाठी देवतांची अनुज्ञा मागण्यात आली. गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

या सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पवनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध संत महंत उपस्थित होते.

ध्वजस्तंभ व धर्मध्वजाचे विधिवत पूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले. जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाचे पूजन केले.

सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ,बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ज्योतिषीय परंपरेतील महत्त्वाचा योग मानला जातो. या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. धर्मध्वजारोहण करून सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ होतो. धर्मध्वज हा सिंहस्थाच्या पौराणिक परंपरेचे, गोदावरीच्या पावित्र्याचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानला जातो.

सिंहस्थ धर्मध्वजावरील शुभचिन्हांना विशेष महत्त्व,सिंहस्थ धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक, घंटा आदी धार्मिक आणि ज्योतिषीय प्रतीकांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रतीकामागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक संदर्भ आहेत.

सूर्य आणि चंद्र ही प्रतीके अमृतकुंभाच्या रक्षणाशी संबंधित मानली जातात. बृहस्पती आणि सिंह ही प्रतीके सिंहस्थाच्या ज्योतिषीय कालगणनेशी जोडलेली आहेत. मगर हे गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक आहे. ॐकार आणि स्वस्तिक ही चिन्हे आध्यात्मिकता, मांगल्य आणि कल्याणाचा संदेश देतात. धर्मध्वजावरील बारा घंटा, दहा दिशा आणि ‘ह्रीं’ हे बीजाक्षर यांनाही विशेष धार्मिक व प्रतीकात्मक महत्त्व आहे.अशा विविध प्रतीकांनी युक्त धर्मध्वज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचे आणि त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवितो.

शंखनाद, मंत्रोच्चार आणि जयघोषात धर्मध्वजारोहण,धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यात आली.

पुरोहितवृंदांच्या मंत्रोच्चारांत, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजारोहणाचा सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपस्थित साधू-महंत आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेतला.

धर्मध्वजारोहणानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या या धर्मध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले.

0000000

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर – मंत्री छगन भुजबळ

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर

मुंबईत भुलेश्वर येथे गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta