vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर

सांगली, प्रतिनिधी) : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अपघाताने अडकलेले एक रुपयांचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढून बालिकेचे प्राण वाचविले. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली शितल मनोळीकर (रा. सावळी, ता. मिरज) या पाच वर्षीय बालिकेने खेळताना एक रुपयांचे नाणे गिळल्याने ते श्वासनलिकेच्या वरच्या भागात अडकले होते. त्यामुळे तिला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. यापूर्वी तिच्यावर हृदयाची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. तसेच रक्त पातळ ठेवण्याची औषधेही सुरू असल्याने शस्त्रक्रिया अधिक जोखमीची ठरत होती.

बालिकेला तातडीने शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एंडोस्कोपी सर्जन तथा शल्यचिकित्सा पथक प्रमुख डॉ. प्रशांत श्रीमंत दोरके यांनी सहकाऱ्यांसह विलंब न लावता दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला. भूलतज्ज्ञ व शल्यचिकित्सकांच्या समन्वयातून अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया पार पडली आणि नाणे यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.

या शस्त्रक्रियेत डॉ. समरिन शेख, डॉ. स्नेहल सुपे, डॉ. आयुष चोरडिया, भूलतज्ज्ञ डॉ. सुनिता शेंडे, डॉ. कात्यायनी गुरव तसेच परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुबोध उगाणे, डॉ. संतोष दळवी आणि डॉ. प्रिया होंबाळकर यांचेही मार्गदर्शन लाभले

.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियंका राठी आणि डॉ. रूपेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. उपचारानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या तत्परतेचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

०००००

 

 

 

 

संबंधित पोस्ट

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

vishwatmaklokswamivarta

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा

वारणा धरणात 34.07 टी.एम.सी. पाणीसाठा

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील उपधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी इप्सित, प्रत्यय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta