
कॅन्सर तपासणी घराजवळ – मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची नवी मुंबईत विशेष मोहीम
आरोग्य प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत ३० वर्षावरील स्त्री व पुरुषांची नियमित तपासणी करण्यात येते व त्याची नोंदणी पोर्टलवर करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याविषयी तपासणी व चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संदर्भित करण्यात येत आहे.
या तपासणीमध्ये अधिक भर घालत दि. 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत शासनामार्फत कॅन्सर व्हॅन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाठविण्यात आली होती. या अनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने नमुंमपा क्षेत्रात ठिकठिकाणी कॅन्सर तपासणी मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.
या कॅन्सर तपासणी विशेष मोहिमेत नवी मुंबईतील 1,292 नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.
सदर व्हॅन मध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग बाबत तपासणी व चाचण्या करण्यात आल्या. या मोहिमेचे आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले होते .
दि. 3 ऑगस्ट



