vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचेकडून नवी मुंबईतील डास प्रतिबंधात्मक विशेष धुरीकरण मोहीमेची पाहणी

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचेकडून नवी मुंबईतील डास प्रतिबंधात्मक विशेष धुरीकरण मोहीमेची पाहणी

 

          नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या नियोजनानुसार 17 ते 22 ऑगस्टपर्यंत विशेष धुरीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

          यामध्ये 17 ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – सीबीडी, वाशीगाव व दिघा या पहिल्या गटाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये रासायनिक धूरीकरण मोहिम राबविण्यात आली. सदर मोहीमेचे पर्यवेक्षण संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांचेमार्फत केले जात आहे.

          आज 18 ऑगस्ट रोजी मोहीमेच्या दुस-या दिवशी दुसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे – से-48, कुकशेत, पावणे, घणसोली येथे रासायनिक धूरीकरण करण्यात आले. या मोहीमेअंतर्गत होणा-या धुरीकरण कामाची तपासणी नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी कुकशेत येथील कार्यक्षेत्रात केली.

         घणसोली भागातील धुरीकरण मोहीमेंतर्गत होणा-या कामांच्या ठिकाणी एफ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. ललिता घनश्याम मढवी यांनी भेट देत घणसोली कार्यक्षेत्रात पाहणी केली.

          उद्या बुधवार दि. 19 ऑगस्ट रोजी तिसऱ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – करावे, नेरुळ-2, तुर्भे, नोसीलनाका, कातकरीपाडा क्षेत्रात तसेच गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी चौथ्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – शिरवणे, सानपाडा, इलठणपाडा येथे धुरीकरण केले जाणार आहे.

          शुक्रवार दि. 21 ऑगस्ट रोजी पाचव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- नेरुळ 1, जुहुगाव, महापे, चिंचपाडा आणि शनिवार दि. 22 ऑगस्ट रोजी सहाव्या गटातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – इंदिरानगर, खैरणे, राबाडा, ऐरोली येथे विशेष धुरीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

           आरोग्य विभागामार्फत धुरीकरणाप्रमाणेच आवश्यक डास प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. त्या जोडीला नागरिकानींही आपल्या घरात व घराभोवतालच्या परिसरात पाणी साचलेल्या ठिकाणी डास आळ्या होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…