vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देशप्रदेश

महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करताना केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, उत्पादन, कृषी, अन्नप्रक्रिया आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी यांना चालना देण्याची गरज असल्याचे मत राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले

#महाराष्ट्र आणि #व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करताना केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, उत्पादन, कृषी, अन्नप्रक्रिया आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी यांना चालना देण्याची गरज असल्याचे मत राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करताना केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, उत्पादन, कृषी, अन्नप्रक्रिया आणि दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी यांना चालना देण्याची गरज असल्याचे मत राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. इंडो-व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (आयव्हीसीसीआय) ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तसेच व्हिएतनामच्या उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासोबत मुंबई येथे झालेल्या संवादात्मक बैठकीत ते बोलत होते.

भारत–व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापाराने आता १६ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडला असून, २०३० पर्यंत २५ अब्ज अमेरिकी डॉलरचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. १९९० मध्ये आयव्हीसीसीआयची स्थापना झाली तेव्हा दोन्ही देशांमधील व्यापार काहीशे दशलक्ष डॉलरच्या पातळीवर होता. त्यामुळे गेल्या काही दशकांत झालेली वाढ ही दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांच्या वाढत्या व्याप्तीचे द्योतक असल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले.

२०२६ हे भारत–व्हिएतनाम संबंधांसाठी महत्त्वाचे वर्ष ठरल्याचे सांगताना त्यांनी मे २०२६ मध्ये व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या भारत दौऱ्याचा उल्लेख केला. या भेटीदरम्यान भारत–व्हिएतनाम संबंधांना ‘वर्धित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्यात आला.

यावेळी व्हिएतनामचे मुंबईतील वाणिज्यदूत जनरल ले क्वांग बिएन, आयव्हीसीसीआयचे अध्यक्ष अजयकांत रुईया, उपाध्यक्ष कमल के. सेठ, कार्यकारी सचिव संजय मेहता, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासंचालक अजित मंगरुळकर तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिक प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान !* 

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

*नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी राज्यस्तरीय ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याबद्दल वरिष्ठ क्षयरोग उपचार परिवेक्षक रवींद्र पाईकराव यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta