vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ टक्के मधील जास्तीत जास्त १५ टक्के पर्यंत मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भात विभागाच्या ८ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात योजनेच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रस्ताव सादर करण्याची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१ या पत्त्यावर अर्ज करावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२२२०२३ हा असून ई-मेल आय डी acswomumbaisub@gmail.com हा असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा- मंत्री दत्तात्रय भरणे

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

झाडीपट्टी नाट्यकलेला राजाश्रय देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे देसाईगंज येथे उद्घाटन*

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्ननवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती- खासदार डॉ.कल्याण काळे

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार