vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकाशवाणी, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नौसेना स्वरवंदना’ या संगीतमय कार्यक्रमाचे बुधवार, दि. 12 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. ‘वंदेमातरम्’ गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून नौदलाच्या पश्चिम कमांडच्या वाद्यवृंदाचे 65 कलाकार एकत्रितपणे ही अनोखी स्वरवंदना साकारणार आहेत.

नौसेनेतील स्लो मार्च, क्विक मार्च संगीतासह काही देशभक्तीपर गीतांचा या कार्यक्रमात समावेश असून नौसेनेच्या वाद्यवृंदाची लयबद्ध, सुरेल अनुभूती यातून प्रेक्षकांना निश्चितपणे मिळू शकेल. संगीताचे सूर हे जनमानसासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात. स्वातंत्र्य लढ्यात समरगीते आणि देशभक्तीपर गीतांनी जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. देशभक्तीपर समूहगीतांच्या माध्यमातून आकाशवाणीनेही ही परंपरा मागील अनेक दशकांपासून जपली आहे. नेव्हल बँड अर्थात नौसेना वाद्यवृंद देखील हेच कार्य अनेक वर्षांपासून करीत आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या भव्य रंगमंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्तीच्या या सुरेल सोहळ्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

००००

 

संबंधित पोस्ट

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी

11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आदर्श आचारसंहिता लागूØ 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे लागणार 141 प्रभागातून 286 सदस्य निवडले जाणार;145स्त्रीयांसाठी राखीव, दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणारØ आचारसंहितेसाठी 1950/1077 हेल्पलाईन नंबर जारी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा #शपथविधी गुरुवार, १४ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे.