जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज पहाटे ‘शी, शोर, शाईन- २०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी-
दिव्याज फाउंडेशन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मेघा श्रेय यांच्या संयुक्त विद्यमाने जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज पहाटे ‘शी, शोर, शाईन- २०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
🔷दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती अमृत फडणवीस, प्रसिद्ध अभिनेते श्री. अजय देवगण, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार श्री. अमित साटम, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, आमदार श्री. राम कदम, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुधा सिंग, सह आयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले आदींची यावेळी उपस्थिती होती.
🔷विविध शाळेतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक आदींनी मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी सुमारे ३४ टन कचरा संकलित करण्यात आला.
🔷जुहू समुद्र किनाऱ्यावर विसर्जित करण्यात आलेल्या निर्माल्यातून फुले स्वतंत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून अगरबत्ती आदी उत्पादने तयार केली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी भेट दिली.