vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लाहेरीच्या तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार**‘पीएम-जनमन’ अंतर्गत मिळाला सुरक्षित निवारा; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश*

लाहेरीच्या तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार**‘पीएम-जनमन’ अंतर्गत मिळाला सुरक्षित निवारा; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश**‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दुर्गम भागातील योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा*

 

गडचिरोली, प्रतिनिधी: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील श्रीमती तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीत अनेक वर्षे साध्या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या तुलशी पिडसे यांना आता पक्का व सुरक्षित निवारा मिळाला आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी त्यांच्या घराला प्रत्यक्ष भेट देऊन घरकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत तुलशी पिडसे यांचा गृहप्रवेश पार पडला.*प्रतिकूल परिस्थितीतून पक्क्या घरापर्यंतचा प्रवास*लाहेरी येथील श्रीमती तुलशी दस्सा पिडसे या माडिया गोंड समाजातील आहेत. आई आणि भावाचे निधन झाल्यानंतर त्यांचा कौटुंबिक आधार हरपला. एका छोट्याशा झोपडीत त्या वास्तव्य करीत होत्या. विशेषतः पावसाळा व बदलत्या हवामानात या निवाऱ्यात राहणे अडचणीचे होते.विशेष दुर्बल आदिवासी समूहातील कुटुंबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पीएम-जनमन’ अंतर्गत ग्रामपंचायत लाहेरीमार्फत सन २०२४-२५ मध्ये तुलशी पिडसे यांना घरकुल मंजूर करण्यात आले. योजनेअंतर्गत त्यांच्या पक्क्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, अनेक वर्षांच्या कच्च्या निवाऱ्यानंतर त्यांना आता सुरक्षित निवारा उपलब्ध झाला आहे.

*‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत लाभार्थ्यांशी थेट संवाद*नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ वेळेत मिळावा, प्रलंबित कामांना गती मिळावी तसेच प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागातील योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्यात येत आहे.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे भेट देऊन तुलशी पिडसे यांच्या नवनिर्मित घरकुलाची पाहणी केली. त्यांनी तुलशी पिडसे यांच्याशी संवाद साधून घरकुल मंजुरीपासून बांधकाम पूर्ण होईपर्यंतची प्रक्रिया तसेच नवीन घरामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली.

यावेळी पारंपरिक पद्धतीने दिवा प्रज्वलित करून तुलशी पिडसे यांचा गृहप्रवेश करण्यात आला.*जिल्ह्यात ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी*गडचिरोली जिल्ह्यात विशेष दुर्बल आदिवासी समूहातील नागरिकांना पक्का व सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम-जनमन’ अंतर्गत घरकुलांची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर घरकुलांची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे. विशेषतः दुर्गम व अतिदुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत

*दुर्गम भागातील सेवांवर विशेष लक्ष*‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भामरागडसारख्या दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी योजनांच्या अंमलबजावणीचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन लाभार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.या भेटीप्रसंगी भामरागड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायतीचे संबंधित अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

14 जुलै, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत.

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta