vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पुन्हा खिंडार!सेजल कदम यांच्यासह शेकडो महिलांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश…

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पुन्हा खिंडार!सेजल कदम यांच्यासह शेकडो महिलांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश…

ठाणे प्रतिनिधी- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग वाढू लागले आहे. विविध पक्षांमधील कार्यकर्ते राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश करीत आहेत. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या सेजल कदम आणि त्यांच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश केला.

देशाचे सर्वसमावेशक नेतृत्व शरद पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आश्वासक नेतृत्व सध्याच्या काळात दिसत असल्याचे सांगत सेजल कदम यांनी हा पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी (श.प) च्या च्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. रोहिणी खडसे आणि ॠताताई आव्हाड यांनी सेजल कदम आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

 यावेळी ठामपा गटनेते अभिजीत पवार, शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, मकसूद खान, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, युवा नेते विरू वाघमारे, , बिपीन गेहलोत, सचिन पंधरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी, रोहिणी खडसे यांनी सर्व महिलांचे पक्षात स्वागत करताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा महिलांना सन्मान देणारा पक्ष असून या पक्षात महिलांना समान संधी देत असल्यानेच इनकमिंग वाढत आहे. सेजल कदम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असून शरदचंद्र पवार , सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार सेजल कदम या पक्षात जोमाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

 

संबंधित पोस्ट

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय  कार्यालयात आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंधअत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट

vishwatmaklokswamivarta