vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंधअत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंधअत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट

 

            नवी मुंबई, प्रतिनिधी: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परतीच्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचे बंदी आदेश परिवहन विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत.

         गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींचे आगमन लक्षात घेऊन दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीअॅक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

     पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

     सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जनासाठी व काही अंशी परतीच्या प्रवासासाठी दि. १९ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत आणि दि. २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीअॅक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

 अनंत चतुर्दशी १२ दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी व परतीच्या प्रवासासाठी दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील याच प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना निर्बंधातून सूट       या निर्बंधांमधून जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, मेडिसिन, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला, नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.याशिवाय पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.

महामार्गाच्या कामांसाठी आवश्यक वाहनांना परवानगी       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्तीची कामे तसेच त्यासाठी आवश्यक साहित्य, माल आदींची ने-आण करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

 

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्‍यपदी आमदार सुधाकर अडबाले यांची नियुक्‍तीसभापतींनी केली तीन समित्‍यांवर नियुक्‍ती..

काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २२.३३ कोटींचे कोकेन जप्त, दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक. पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश..

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

अहमदाबाद विमान दुर्घटनेत  एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन-सुमित सभरवालांच्या 85 वर्षीय पित्याकडून अखेरचा निरोप

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*